गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विजय केशव काकतकर नियत वयोमानाप्रमाणे दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. ते दि. २३ डिसेंबर १९९६ पासून जवळपास २८ वर्ष १० महिने महाविद्यालयाच्या सेवेत कार्यरत होते. या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि सहसंचालक कार्यालयातील विविध जबाबदारीची कामे पार पाडली. याबरोबरच त्यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी भांडार उपक्रमाचे सचिव, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे युनिट अध्यक्ष तसेच त्यांनी महाविद्यालयाच्या कर्मचारी पतसंस्थेचे खजिनदार म्हणूनही काम केले आहे. त्यांना २०२३ या वर्षी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा ‘उत्कृष्ट कर्मचारी’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
श्री. विजय काकतकर यांना महाविद्यालय आणि संस्थेतर्फे शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने डॉ. विवेक भिडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्री. काकतकर यांनी महाविद्यालयासाठी केलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. प्राध्यापक प्रशिक्षण व आस्थापनेतील विविध जबाबदारीच्या कामांचा विशेष उल्लेख केला व त्यांना पुढील आयुष्यासाठी सर्वांतर्फे शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. विवेक भिडे यांनी श्री. काकतकर यांनी संस्थेसाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख केला. निवृत्तीनंतरही संस्थेला व महाविद्यालयाला त्यांच्या अनुभवाची गरज लागल्यास त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कर्मचारी सहकाऱ्यांतर्फे श्री. महेश सरदेसाई यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी श्री. काकतकर आणि महाविद्यालयाचे कार्यालय, कार्यालयीन सहकारी आणि त्यांच्या कामाची पद्धत जुन्या आठवणी सांगून विषद केली. सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंतच्या कामातील विशेषतः जे तांत्रिक बदल होत गेले त्याप्रमाणे श्री. काकतकर यांनी काम केले असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
![]() |







Visitors Online : 0