गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सीमा वीर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी थोर अर्थशास्त्रज्ञ, मनववंशशास्त्रज्ञ, महान कायदेपंडित, संविधानाचे शिल्पकार आणि मानवतावादाचे प्रखर पुरस्कर्ते, अनेक लोकांनी त्यांच्या कार्यावर संशोधन करून पीएच.डी. प्राप्त केलेली आहे; असे सांगून डॉ. आंबेडकर यांनी आपल्या लोकशाहीला संविधानाने हक्क आणि कर्तव्ये दिली. ते सामाजिक समतेच्या महान लढाईतील अग्रदूत होते. तसेच त्यांनी अनेक अनेक संदेश समाजाला दिले; यामध्ये ज्ञान, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांच्या पुरस्काराचा प्रामुख्याने समावेश होता. आज डॉ. आंबेडकर तसेच त्यांच्या सर्व कार्याचे स्मरण करण्याबरोबरच आपल्या जीवनात त्यांच्या कार्याचा अवलंब केला पाहिजे तसेच त्यांचे सर्व संदेश कृतीत उतरवण्याची आपल्या सर्वांना गरज आहे; असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मराठी विभागाच्या डॉ. सीमा वीर यांनी केले. या कार्यक्रमाला विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, डॉ. तुळशीदास रोकडे, डॉ. सोनाली कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, प्र. प्रबंधक श्री. नंदकुमार गोळपकर, श्री. महेश सरदेसाई, विभाग प्रमुख, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
![]() |







Visitors Online : 0