gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एआय-रोबो इनोव्हेशन्स फेअर-२०२५’ उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न

वर्ल्ड कॉम्प्युटर लिटरेसी डे – २०२५च्या औचित्याने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त), रत्नागिरी येथील संगणकशास्त्र विभागात ‘एआय-रोबो इनोव्हेशन्स फेअर -२०२५’ प्रदर्शनी दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली. याप्रदर्शनामध्ये द्वितीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि आयओटी ऑटोमेशनवर अधातीत विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

तरुणांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि तांत्रिक कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन पाहायला मिळाले. कॉलेजमधील बी.एम.एस.; बॅफ, बी.कॉम.; बी.एस्सी.; गणित, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र; बी.बी.ए.; प्रथम वर्ष कला, सुयश इ. ११ वी; भौतिकशास्त्र; प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र. जैवतंत्रज्ञान, राष्ट्रीय छात्र सेना, पदव्युत्तर विभाग; यांसारख्या विविध विभागांतील सुमारे ३०० विद्यार्थी तर शिर्के प्रशालेतील सुमारे ६० विद्यार्थी आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यातील, श्रीमान भागोजी विधी महाविद्यालयातील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भेट देऊन प्रकल्पांविषयी जाणून घेतले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि संगणकशास्त्र आणि माहितीतंत्रज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट मॉडेलचे रिअल लाईफमध्ये प्रत्यक्ष कार्यान्वयन करण्याचे तसेच भविष्यात पेटंट घेण्याचे आव्हान दिले.

प्रदर्शनाला भेट दिलेल्या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या नवोपक्रम, तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यक्षमता याची मनापासून प्रशंसा केली. महाविद्यालय मधून सर्व स्तरांतून या प्रदर्शनाचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांना मोठा प्रोत्साहनात्मक प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि विभागातील सर्व प्राध्यापक व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.