gogate-college-autonomous-updated-logo

आरोग्य तपासणी शिबीर

महिला विकास कक्ष, गोगटे जोगळेकर  महाविद्यालय (स्वायत्त) , रत्नागिरी आणि  रोटरी क्लब मिडटाउन, रत्नागिरी यांच्या विद्यमाने दिनांक १२/१२/२०२५ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत आयोजित करण्यात आले. महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा.डॉ.सोनाली कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिला विकास कक्षातर्फे या शैक्षणिक वर्षात १२ व १३ सप्टेंबर २०२५ रोजी महिलांविषयक आंतरराष्ट्रीय परिषद, विद्यार्थीनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, पी.सी.ओ.डी या विकाराबद्दल मार्गदर्शन तसेच विद्यार्थीनींकरिता उद्योजकतेबाबत मार्गदर्शन अशा प्रकारचे कार्यक्रम सतत घेतले जातात असे सांगितले. त्यामध्ये विद्यार्थ्यीनिनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आणि आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे महत्व सांगितले.

आरोग्य तपासणीसाठी उपस्थित रोटरी क्लब मिड टाऊनच्या सर्व सदस्यांचे ,विज्ञान  उपप्राचार्या प्रा.डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी स्वागत केले.या शिबिराचे उद्घाटन करताना त्यांनी उत्तम शिक्षणासाठी उत्तम आरोग्य असणे आवश्यक आहे असे म्हटले. या आरोग्य तपासणी शिबीरासाठी श्री.  सिताराम सावंत, खजिनदार, रोटरी क्लब, श्री.राजेंद्र कदम, सचिव, रोटरी क्लब,  डॉ. प्रियांका कांबळे, दंतचिकीत्सक, डॉ. संदीप करे, फिजिशियन, डॉ. स्वप्ना करे,फिजिशियन  हे उपस्थित होते. या शिबिराचा १००विद्यार्थिनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ  घेतला. या शिबीरात विद्यार्थीनींची बॉडी मास इंडेक्स (BMI),  रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण, दातांचे आरोग्य तपासणी, स्त्री शरीर विकार याबाबत वैयक्तिक समुपदेशन करून आवश्यक औषधोपचार सुचविण्यात आले. या शिबीरासाठी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच तिन्ही शाखांचे उपप्राचार्य यांनी सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गौरी पटवर्धन यांनी केले. महिला विकास कक्षाची वर्ग प्रतिनिधी कु. श्रावणी प्रभूमहाजन हिचे कार्यक्रम आयोजनामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.