सन २०२५ चा स्व. निर्मलादेवी खंडेलवाल काव्य सन्मान रत्नागिरी येथील कवयित्री डॉ. चित्रा मिलिंद गोस्वामी यांच्या ‘कश्ती’ या हिंदी काव्यसंग्रहास देण्यात आला. काव्यानंद प्रतिष्ठान. पुणे आणि साईश इन्फोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन पुणे येथे संपन्न झाले. निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात काव्यानंद प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व संत चित्रकार श्री. वि. ग. सातपुते उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री. सूर्यकांत वैद्य तसेच डॉ. श्रीकांत तारे उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनील खंडेलवाल तसेच श्री. विवेक पोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आतापर्यंत हिंदी, मराठी भाषेतील कविता, कथा, बाल-साहित्य आणि अनुवादित २३ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत तसेच १० संपदन केलेली पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक लेखन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी डॉ. चित्रा गोस्वामी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




Visitors Online : 0