gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे श्री. प्रशांत मुरकर आणि श्री. विजय गोरीवले सेवानिवृत्त

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधील प्रयोगशाळा सहाय्यक श्री. प्रशांत दत्ताराम मुरकर आणि ग्रंथालय परिचर श्री. विजय बाळकृष्ण गोरीवले हे दि. ३१ मे २०२६ रोजी त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी महाविद्यालयात ३६ वर्षे ८ महिने अशी दीर्घकाळ सेवा केली. या सेवाकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. अत्यंत मितभाषी आणि मनमिळाऊ असणाऱ्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना महाविद्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. याप्रसंगी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना कार्यतत्परता, कामातील अचूकपणा तसेच त्यांचा मनमिळाऊपणा हे दोन्ही कर्मचाऱ्यांचे सद्गुण होते असे सांगून त्यांच्या महाविद्यालयातील सेवेचा आढावा घेतला. ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनीही दोन्ही कर्मचाऱ्यांविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते; सर्वांच्यावतीने दोघांना सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments are closed.