gogate-college-autonomous-updated-logo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेत कु. सेजल मिस्त्री आणि कु. दिक्षा मोहिते प्रथम

nibandh-spardha-winners-2

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दरवर्षी जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.ही स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर घेतली गेली.

या निबंध स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलाविषयक विचार, फूले, शाहू, आंबेडकर: समता परिवर्तनाचा वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयक विचार, माझे संविधान माझी जबाबदारी, मी वाचलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत दोनही स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांसाठी अनुक्रमे रुपये एक हजार, रुपये सातशे, रुपये पाचशे आणि सन्मानपत्र तर उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकांसाठी सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते.

वरिष्ठ महाविद्यालय गटातून कु. सेजल भार्गव मिस्त्री यांनी प्रथम तर कु.साहिल संदिप कांबळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आणि कु. आर्या प्रसाद चव्हाण ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. कु. सुहानी राजेंद्र गुरव, कु. आदेश अशोक जाधव आणि कु. निकिता निवृत्ती खवरे या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

कनिष्ठ महाविद्यालय गटातून कु. दिक्षा यशवंत मोहिते यांनी प्रथम तर कु. अनुष्का सुनिल यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आणि कु. प्रणव अंकुश हातिसकर हा विद्यार्थी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. कु. श्रावणी बाहुबली नाईक, कु. संस्कृती विनायक पाटील आणि कु. लावण्या दिपक नार्वेकर या विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

दि. २७ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. कृष्णात खांडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रा. क्षमा पुनसकर, प्रा. भालचंद्र रानडे आणि प्रा. अभिजित भिडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व परीक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या निबंध स्पर्धेचे समन्वयक म्हणून हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Comments are closed.