भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय (Ministry of Earth Sciences) आणि ओशन सोसायटी ऑफ इंडिया (OSI), कोची यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत ‘सागर किनारा स्वच्छता उपक्रमा’त रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने अत्यंत सक्रिय व यशस्वी योगदान दिले आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.केवळ समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता न करता, तेथील कचऱ्याचे स्वरूपानुसार त्याचे वर्गीकरण, मापन व पुढील कार्यासाठी नियोजन करण्यात आले.
हा संपूर्ण उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. प्रा. सचिन सनगरे (समाजशास्त्र विभाग), प्रा. अभिजित भिडे, प्रा. निलेश जोशी, प्रा. सारिका माळी, प्रा. मनस्वी लांजेकर, डॉ. विराज चाबके या प्राध्यापकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले आणि उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
प्रामुख्याने खालील प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला:
सिंगल-यूज प्लास्टिक (Single-use Plastic): यामध्ये पाण्याचा बाटल्या, शीतपेयांचे (Soft Drinks) कप, प्लास्टिकचे चमचे, आणि खाद्यपदार्थांची वेष्टने (Lappers/Packets) यांचा समावेश सर्वात जास्त होता.
पर्यटनाशी संबंधित कचरा: पर्यटकांनी किनाऱ्यावर टाकलेले पाण्याच्या बाटल्यांचे आणि गुटक्यांचे खाचके, अन्नपदार्थांचे उरलेले तुकडे, आणि थर्माकोलच्या डिशेस.
सागरी कचरा (Marine Debris): समुद्राच्या लाटांसोबत वाहून आलेले आणि किनाऱ्यावर साचलेले जुने मासेमारीचे जाळे (Nylon Nets), प्लास्टिकचे तुकडे, आणि नायलॉनच्या दोऱ्या.
काचेच्या बाटल्या: मद्यपींनी किंवा पर्यटकांनी टाकलेल्या काचेच्या बाटल्या, ज्या फुटल्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक मच्छिमारांना इजा होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.
समुद्रकिनारी कचरा साचण्यामागीलप्रमुख कारणे-
पर्यटकांची बेजबाबदार वृत्ती: किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणारे अनेक पर्यटक कचरा कुंडीचा वापर न करता प्लास्टिक आणि इतर कचरा थेट वाळूतच टाकून देतात.
कचरा कुंड्यांची अपुरी संख्या: किनाऱ्याच्या मुख्य भागाव्यतिरिक्त इतर ठिकाणी कचरा टाकण्यासाठी पुरेशा डस्टबीन उपलब्ध नसणे.
अहवालातील शिफारस (Recommendation): भाट्ये किनाऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी पर्यटकांमध्ये ‘नो प्लास्टिक झोन’ विषयी जनजागृती करणे, किनाऱ्यावर ठिकठिकाणी ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी डस्टबीन्स ठेवणे आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने ‘कचरामुक्त किनारा समिती’ स्थापन करणे आवश्यक आहे. सामान्यनागरिकांनी, पर्यटकांनी आपला सागर किनारा कचरामुक्त राहील यासाठी नियमाचे पालन केले पाहिजे.
ग्लोबल वॉर्मिंग आणि समुद्रकिनाऱ्यांचे वाढते प्रदूषण या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि ‘ओशन सोसायटी ऑफ इंडिया’च्या वतीने देशभरात हे अभियान राबवले जात आहे. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नोंदवलेला सक्रिय सहभाग आणि केलेले संशोधन हे स्थानिक पातळीवर किनारपट्टी संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक आणि संशोधनात्मक कार्याचे शैक्षणिक क्षेत्र आणि पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.
![]() |
![]() |








Visitors Online : 0