गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तृतीयवर्ष समाजशास्त्र विभागातील विद्यार्थांनी व्यवसायभिमुख कौशल्य अभ्यासक्रमाच्या (Vocational Skill Course) विषयासाठी भाट्ये समुद्रकिनारा येथील स्वच्छता संदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुसार विषय अध्ययनासोबत विद्यार्थांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसन होणे आवश्यक आहे. यासाठी समाजशास्त्र विभागाने सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती हा अभ्यासक्रम तयार केला असून विद्यार्थांना सर्वेक्षण, मुलाखती, संशोधन व अहवाल लेखन याचे कौशल्य निर्माण होणे हे उद्देश आहेत. सर्वेक्षणाचे प्रात्येक्षिक कार्यत्यांनी पूर्ण करून समुद्रकिनारा कचरामुक्त ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची शिफारस केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या उद्दिष्टांना अनुसरून, केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा, या हेतूने हे प्रात्यक्षिक कार्य राबवण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, मुख्य विषयाच्या अध्ययनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये रोजगारभिमुख आणि व्यावसायिक कौशल्ये (Vocational Skill Course) निर्माण होणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाने ‘सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती’ हा विशेष कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ वर्गात न शिकवता थेट समाजात पाठवून सर्वेक्षण (Survey), मुलाखती (Interviews), शास्त्रीय संशोधन (Social Research) आणि प्रत्यक्ष अहवाल लेखन (Report Writing) या घटकांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
या कौशल्य अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन तेथील कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषणाची स्थिती आणि पर्यटकांच्या सवयी यांवर आधारित प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण केले. यामध्ये स्थानिक व्यावसायिक, पर्यटक आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संकलित केलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी केवळ समस्येची मांडणी न करता, समुद्रकिनारा कायमस्वरूपी कचरामुक्त आणि निसर्गरम्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या व व्यावहारिक उपाययोजनांची शिफारस आपल्या अहवालात केली आहे.
विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक औपचारिकता म्हणून नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे प्रात्यक्षिक कार्य उत्तमरीत्या पूर्ण केले. त्यांच्या या संशोधन वृत्तीचे आणि समाजोपयोगी उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पनाआठल्ये, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, विभागातील प्राध्यापक आणि रत्नागिरीतील पर्यावरणप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण त्यांच्यात उत्तम अहवाल लेखनाचे व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली आहे.
“ |

“





Visitors Online : 0