gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजीविद्यार्थी श्री. सावळाराम साळगांवकर यांची सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर नियुक्ती

ताडदेव पोलीस ठाणे, मुंबई येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. सावळाराम पुष्पावती पुरुषोत्तम साळगांवकर यांना सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची अपर उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी), नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. सावळाराम साळगावकर हे रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विज्ञान शाखेमध्ये भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये (एन.सी.सी.) सक्रिय सहभाग घेतला असून सन १९९२ मध्ये प्रजासत्ताक दिन संचलनासाठी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. सन १९९४ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी मुंबई शहर, विशेष सुरक्षा विभाग (मुंबई), नवी मुंबई, नागपूर आयुक्तालय गुन्हे शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), मुंबई येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. याशिवाय पुणे शहरातील लोणीकंद, सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे.
श्री. सावळाराम साळगांवकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असून वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी, साळगावकरवाडी येथील रहिवासी आहेत. गेली ३२ वर्षे ते पोलीस खात्यात उल्लेखनीय सेवा बजावत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालायाचे प्राचार्य, डॉ. मकरंद साखळकर, प्राध्यापक आणि कर्मचारी यांचेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Comments are closed.