gogate-college-autonomous-updated-logo

“Internal PowerPoint Presentation Competition” गणित विभागाची “पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन” विषयावरील स्पर्धा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांकरीता दि. २२ जुलै२०२६ रोजी “पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन” ह्या विषयावरील स्पर्धेचे आयोजन केले गेले. ह्याप्रसंगी व्यासपीठावर गणित विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक प्रा.आदिती जोशी व प्रा. सुदीप कांबळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत गणित विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे यांनी केले. विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंटचे स्किल्स, स्टेजवरील वावरासाठी आत्मविश्वास मिळणे, संभाषण कौशल्ये येणे ह्या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेल्या प्रा. सुदीप कांबळी यांनी सहभागी विद्यार्थ्यानादैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व, प्रेझेन्टेशनची संधी यामुळे आणिक स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात.प्रेझेन्टेशन करत असताना ते अधिक प्रभावी होण्यासाठी त्या विषयच सखोल अभ्यास असणे गरजेचे असते असेही त्यांनी सांगितले. प्रा. आदिती जोशी यांनी त्यांच्यावेळच्या सदर स्पर्धेच्या आठवणी सांगितल्या व आपण हे करू शकतो हा मोठा आत्मविश्वास ह्या स्पर्धेमधून मिळतो हे आवर्जून सांगितले. सादरीकरण करताना वेग कसा असावा, गणिताच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असाव्यात असेही मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे आपण नेहमी स्वताशी स्पर्धा करावी व त्यातून प्रगती घडवावी असे विद्यार्थ्यांना सांगितले.

सदर स्पर्धेमध्ये एकूण १२ संघ मिळून २२ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यातील कु. शिवम कीर, कु निशात पावसकर व कु. बुश्रा सुवर्णदुर्गकर, कु. साहिल लाखण व कु. प्रणव कदम यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

आपला विषय चांगल्या पद्धतीने मांडणे, आत्मविश्वासाने समोर येऊन बोलणे याचे शिक्षण महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे मिळणे शक्य आहे असे मत विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले तसेचगणित विभागाद्वारे गेली अनेक वर्षे सातत्याने ही स्पर्धा घेण्यात येत असल्याने याबद्दलगणित विभागाचेआणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्पृहा जोशी यांनी तर प्रा. उमा जोशी यांनी आभार मानले.

Comments are closed.