दि. 16 जुलै 2026 रोजी विद्यमान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम पूरक क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. ही क्षेत्रभेट शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्र येथे नेण्यात आली.
या क्षेत्रभेटीचे आयोजन एस. वाय. बी. एस.सी. च्या स्किल इन्हान्समेंट कोर्स (SEC) अंतर्गत वॉटर अँड सॉईल ॲनालिसिस या शैक्षणिक अभ्यासक्रमाला अनुसरून करण्यात आले होते. सदर भेटीदरम्यान डॉ. एन.जी.सोनोने, प्रभारी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक, कृषी संशोधन केंद्र, शिरगांव यांनी मुलांना मार्गदर्शन केले. केंद्राचे कृषी सहाय्यक श्री. राजेश दीपक सावंत आणि श्री. अजय शंकर जाधव यांनी विद्यार्थ्यांना चारसुत्री लावणीच्या योग्य पद्धती समजावून सांगितल्या. यातून मुलांना भाताच्या विविध प्रजाती, त्यांचे संकलन,वितरण यासोबत कृषी संशोधन केंद्र, शिरगांव येथील संशोधन कार्य, गरजेनुसार विविध भात प्रजाती निर्माण करत असताना पाणी व माती परीक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले. तसेच दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कोकणातील कृषी क्षेत्रातील संशोधनपर कार्य याबद्दल सविस्तर माहिती दिली. याबरोबर मुलांना भात लावणीच्या विविध टप्प्यातील कामातही प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली .
या क्षेत्रभेटीमध्ये 32 विद्यार्थी व रसायनशास्त्र विभागाचे डॉ. उमेश संकपाळ, श्री. शिरीन लिमये, श्रीम. श्रीया सरपोतदार सहभागी झाले होते. या भेटीकरिता महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी आयोजन केले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाविद्यालयात सुसज्ज अशी शासनमान्य माती परीक्षण प्रयोगशाळा असलेने कोकणातील शेतकऱ्यांनी माती परीक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. सदर माती परीक्षण हे माफक दरामध्ये करून मिळेल.





Visitors Online : 0