गोगटे जोगळेकरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ‘भात लावणी प्रात्यक्षिक’ क्षेत्र भेट संपन्न
दि. २४ जुलै २०२६ रोजी गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालय, रत्नागिरीच्या ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे ‘भात लावणी’ उपक्रमाचे आयोजन जांभूळवाडी, मेर्वी येथे श्री जयंत फडके यांच्याकडे केले होते. “शेती ही जीवनपद्धती आहे, त्याचा जमाखर्चाशी सबंध नाही.” असे मार्गदर्शन श्री. जयंत फडके यांनी ह्याप्रसंगी केले. आजच्या काळात शेती परवडत नाही म्हणून करत नाही ह्या मताविरुद्ध त्यांनी आपले मुद्दे ठामपणे पटवून दिले. उत्तम नियोजन व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून सेंद्रिय शेती व गांडूळ खत प्रकल्प सारख्या त्यांच्या उपक्रमांची माहिती ह्या प्रसंगी दिली. इंधन तुटवडा, वाढती इंधन किंमत यावर उत्तम पर्याय म्हणजे गोबर गॅसप्रकल्प असल्याचेही श्री. फडके म्हणाले. आज त्यांच्याकडे शेती पूरक दुग्धव्यवसायासाठी १७ ते १८ गुरे आहेत. समृद्ध ग्रामयोजनेसाठी अशी योजना घरोघरी असणे गरजेचे आहे. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पारंपारिक तांदुळ लागवडीच्या पद्धतींचा व्यावहारिक अनुभव देणे, शाश्वत शेतीच्या पद्धतींबाबत जागरूकता वाढवणे आणि अनुभवजन्य शिक्षणाद्वारे समुदायातील सहभागाला प्रोत्साहन देणे हा होता. कौशल्य विकास व अनुभवातून शिक्षण हे नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार आवश्यक आहे.
सदर क्षेत्र भेटीसाठी समन्वयक डॉ. शिवराज गोपाळे, आयोजक प्रा.मयुरेश पंडित, प्रा. सुर्यकांत माने, प्रा. अंबदास रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर ह्यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. क्षेत्रभेटीमध्ये आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे १५ विद्यार्थी सहभागी होते.
![]() |
![]() |








Visitors Online : 0