गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या करिअर गाईडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे दि. ३० जुलै २०२६ रोजी पुण्यातील ग्लोबल आउटसोर्सिंग अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. खाजगी क्षेत्रातील नामवंत बँकांमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंगकरिता भरावयाच्या पदांकरिता या मुलाखती होतील. सदर मुलाखातींकरिता महाविद्यालयातून सन २०२० ते २०२६ पर्यंतचे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात.
सदर मुलाखती गुरुवार दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाची मुख्य इमारत येथे होतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला बायोडेटा, मूळ प्रमाणपत्र इ. कागदपत्रांसहित वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई यांचेशी मोबा. ९४२११४२५२९ संपर्क साधावा. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.





Visitors Online : 3