gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ‘चित्रपट रसास्वाद कार्यशाळा’ संपन्न

chitrapat-rasaswad-workshop (2)

दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘GJC फिल्म क्लबतर्फे’ दोन दिवसीय चित्रपट रसास्वाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं केळकर सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला लेखक, दिग्दर्शक व समीक्षक राजेंद्र बडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या संयोजक व फिल्म क्लबच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी कार्यशाळा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. या कार्यशाळेत राजेंद्र बडे यांनी चित्रपट दिग्दर्शन तसेच समीक्षा क्षेत्रातील मूलभूत संकल्पना विविध चित्रपटांतील दृश्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. त्यामध्ये ‘सिटी ऑफ गॉड’, ‘कोर्ट’, ‘ॲनाटॉमीऑफअफॉल’, ‘ऑफिशियल सिक्रेट्स’, ‘थ्री ऑफअस’ इत्यादी यांचा समावेश होता. तसेच ऑस्कर विजेता लघुपट ‘द लंच डेट’ दाखवून त्याची समीक्षा केली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या कार्यशाळेचा फिल्म क्लबच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी सर्व सदस्य शिक्षकांनी हातभार लावला.

Comments are closed.