![]() |
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे Cyber Shiksha for Cyber Suraksha अभियानांतर्गत १५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘Digital Swatantra Sankalpa’ या सायबर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढत्या सायबर फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमामध्ये Spin Wheel Game च्या माध्यमातून सायबर सुरक्षेशी संबंधित विविध विषयांवर सहभागींचा संवादात्मक सहभाग घेण्यात आला. या उपक्रमामुळे सायबर सुरक्षेचे संदेश मनोरंजक आणि प्रभावी पद्धतीने सहभागींपर्यंत पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील डिजिटल व्यवहारांमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शनाने झाली. यानंतर Cyber Warriors कडून ‘Cyber Chakravyuh’ या जनजागृतीपर नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेत विविध प्रकारच्या बँकिंग फसवणुकीसोबतच Mahanagar Gas KYC Fraud चे सादरीकरण करण्यात आले. KYC अपडेटच्या नावाखाली येणारे संशयास्पद संदेश, बनावट लिंक किंवा APK डाउनलोड करण्यास सांगणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा संदेश नाटिकेतून देण्यात आला.
Anti-Fraud Activation उपक्रमांतर्गत सहभागींच्या मोबाईल व डिजिटल खात्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक सुरक्षा सुविधा सक्रिय करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना Cyber Security Handbook चे वितरण करण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमातून नाटिका, खेळ, प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि संवादात्मक उपक्रम यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला —
“STOP – THINK – VERIFY”
“घाई करू नका, विचार करा आणि पडताळणी करूनच विश्वास ठेवा.”








Visitors Online : 0