Students Win Various Prizes, Including First Place, in ‘Video Phoenix’, ‘Code Phoenix’, ‘Dev Phoenix’ and ‘Research Phoenix’ Competitions
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या संगणकशास्त्र विभागातर्फे आयोजित फिनिक्स सॉफ्टवेअर कॉम्पिटिशन 2026-27 मध्येविद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि संशोधनाच्यामाध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली. संगणकशास्त्र, माहितीतंत्रज्ञान, कृत्रिमबुद्धिमत्ता, IoT, सायबरसुरक्षा, वेब व ॲप्लिकेशन विकास तसेच संशोधन लेखन याविविधक्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्यांना या स्पर्धेत व्यासपीठ मिळाले.
यास्पर्धेअंतर्गत FY B.Sc. – Video Phoenix Reel Competition मध्ये सारा मुकादम व रुकया फणसोपकर यांच्या‘Phishing Attack’या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. सुमया मुकादम व मिफारा मुकादम यांच्या‘Li-Fi’या प्रकल्पाने द्वितीय, तर सिद्धी पावसकर व कस्तुरी पवार यांच्या‘Can AI Replace Programmers?’या प्रकल्पाने तृतीय क्रमांक मिळविला. SY B.Sc. – Code Phoenix Competitionमध्ये फरिहा म्हसकर हिने सादर केलेल्या ‘Cyber Guard’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला. ओम विश्वनाथ बाईत व चिनार विजय मयेकर यांच्या‘CipherVault X’ या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक, तर अमृता महादेव देवळे व लावण्या चंद्रशेखर वाळकर यांच्या‘Hospital Management System’या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला. TY B.Sc. – Dev Phoenix (Individual App/Web Development Project)या विभागात वरद मंगेश सरदेसाई यांच्या‘Astronomer’s Diary Portal’या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. यश सूर्यकांत पकये यांच्या‘SoilTrack – Soil Sample Laboratory Management System’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळविला. रसिक अनंत लिंगायत यांच्या‘QR Based Journal Submission System’आणि श्रेया बंडबे यांच्या‘Seafarer Medical Examination and Certificate Management System’या दोन्ही प्रकल्पांना तृतीय क्रमांक मिळाला.
M.Sc. Part I Computer Science – Research Writing Phoenix Competitionमध्ये वेदांत महेश तेंडुलकर व राज विनायक खानविलकर यांच्या‘Smart Farming 360: An AI-Driven IoT-Based Smart Agriculture System for Weather Prediction’ या संशोधन प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला. M.Sc. Part II Computer Science – Research Phoenix Competition मध्ये वैष्णवी गुरव यांच्या‘Multimodal Emotional Recognition System for Early Detection of Mental Stress Using Face, Voice and Text’ या संशोधनाने प्रथम क्रमांक पटकावला. उमैमा हमदरे यांच्या‘AI Based Voice-Controlled Assistive System for Visually and Physically Individuals Using NLP & ML’ या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक, तर सारा माजगावकर यांच्या‘Predictive Water Consumption Analysis Using IoT and Machine Learning for Smart Water Management’ या संशोधनाला तृतीय क्रमांक मिळाला.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानाची अंमलबजावणी करण्याची संधी मिळाली नाही, तर नाविन्य पूर्णविचार, समस्या निराकरण, संशोधनवृत्ती, प्रकल्प सादरीकरण आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठीही व्यासपीठ उपलब्ध झाले. स्पर्धेच्या आयोजन व विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी परीक्षक श्री. कौस्तुभ भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प विकास, तांत्रिक अंमलबजावणी आणि सादरीकरणाच्या विविध टप्प्यांमध्ये योग्य दिशा मिळाली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डेटासायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आय.टी.-सी.एस. समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, परीक्षक श्री. कौस्तुभ भागवत तसेच संगणकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Phoenix Competition 2026-27 मधील विद्यार्थ्यांचा हा सहभाग आणि यश महाविद्यालयातील तांत्रिक शिक्षण, संशोधनाभिमुख दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनाशक्तीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
![]() |







Visitors Online : 1