gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात GATE आणि JAM २०२७ मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

gate-jam-2027-guidance-workshop (1)

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्यावतीने पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘How to Crack & Face GATE 2027 & JAM 2027’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. जे. एस. केळकर सभागृहात पार पडलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सत्रात ‘आयआयटी बॉम्बे’चे अधिकृत प्रतिनिधी श्री. करम वीर सिंग आणि श्री. सुहास शंभू घोडाम यांनी विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन केले. फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाची रणनीती, पात्रता आणि उच्च शिक्षणातील संधी यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमादरम्यान विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना या परीक्षांचे शैक्षणिक व व्यावसायिक जीवनातील महत्त्व पटवून दिले. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षांमध्ये सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा मार्गदर्शक सत्रांविषयी मनापासून समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले. सदर सत्रास बी.एससी. तृतीय वर्ष व एम.एससी. भाग १ व २ मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विज्ञान विभागातील बहुसंख्य अध्यापक वर्ग या वेळी उपस्थित होता. उपस्थितांच्या उत्साही प्रतिसादासह कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.