गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. निशा केळकर यांची राष्ट्रीय स्तरावरील रिफ्रेशर कोर्ससाठी ‘इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅड अॅस्ट्रोफिजिक्स’ मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या रिफ्रेशर कोर्सकरिता निवड झाली आहे. सदर कोर्स महाविद्यालीन आणि विद्यापीठ स्तरावर काम करणाऱ्या निवडक प्राध्यापकांसाठी दरवर्षी विनामूल्य आयोजी केला जातो. या निमित्ताने त्यांना ‘इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅड अॅस्ट्रोफिजिक्स’ येथे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे.
या निवडीबद्दल भौतकशास्त्र विभागातील डॉ. महेश बेळेकर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.