gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) दि. ५ जुलै पासून ‘बी. कॉम. इन मॅनेजमेंट स्टडीज’ या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश सुरु

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे B. Com. (Management Studies) प्रवेश प्रक्रिया दि. ५ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मुंबई विद्यापीठाने अनेक अभ्यासक्रमांमध्ये बदल केलेले आहेत. पूर्वीचा BMS (Bachelor In Management Studies) हा अभ्यासक्रम आता ‘बी.कॉम. इन मॅनेजमेंट स्टडीज’ B.Com. (Management Studies) या नावाने सुरू झाला आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) सुरू होत आहे.

याची प्रवेश प्रक्रिया दि. ५-७-२०२४ पासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाकरिता कला, विज्ञान, वाणिज्य, MCVC या शाखेतून ह्यावर्षी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.

सदर अभ्यासक्रमात व्यवस्थापनाशी संबंधित विषय शिकवले जातात. या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात १) मार्केटिंग २) फायनान्स असे २ स्पेशलायझेशन विषय आहेत. या अभ्यासक्रमात, group discussion, presentation, industrial visit, advertising, product designing, share trading, business planning, business communication, management meet, research project असे व्यावसायभिमुख शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थी MBA किंवा इतर व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊ शकतात. अभ्यासक्रमाचा उपयोग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, विविध औद्योगिक व्यवस्थापनामध्ये, MNC मध्ये नोकरी मिळवण्याकरता होणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी लवकरात लवकर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.