गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने एडस् जनजागृती उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. स्वयंसेवकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयोजित उपक्रमात भाग घेतला तसेच डिजिटल पोस्टर स्पर्धेत भाग घेऊन एड्स प्रतिबंध, निदान व उपचार याबाबत माहिती संदर्भात जाणीवजागृती उपक्रमात सक्रीय सहभाग दिला.
महाविद्यालयातील मार्गदर्शन व्याख्यानात सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नितीन पोतदार यांनी एचआयव्ही विषाणू आणि त्याची बदलती रचना याची सखोल माहिती दिली. रोगाचा इतिहास व सद्यकालीन स्थिती याचीही माहिती दिली. विषाणूची बाधा झाल्यास रोग प्रतिबंध शक्ती वाढविणे, तसेच गैरसमज टाळणे, प्रतिबंधाची व काळजीचे उपाय यावर विस्ताराने विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
जिल्हा रुग्णालय आयोजित उपक्रमात आयसीटीसी विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील, समुपदेशक सतीश कांबळे, समुपदेशक राहुल खरात, एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन सनगरे आणि स्वयंसेवक उपस्थित होते. महाविद्यालयातील उपक्रमात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थी, कार्यक्रमाधिकारी प्रा. उमा जोशी यांनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनातून आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. उमा जोशी यांच्या नियोजनातून सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पोतदार यांचे सहकार्याने महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी या एडस् जाणीव जागृती उपक्रमात यशस्वी सहभाग घेतला.
![]() |
![]() |
![]() |



