gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘एड्स जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भित्तीपत्रक स्पर्धा, शॉर्ट फिल्म स्पर्धा व स्कीट स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच डॉ. योगिता चौधुरी, बालरोगतज्ज्ञ, निर्मल बालरुग्णालय, रत्नागिरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेकरिता ३० भित्तीपत्रके, नऊ शॉर्ट फिल्म आणि चार स्कीट सदर झाली. सदर स्पर्धेत सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विभागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकूण १८२ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. भित्तीपत्रक स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पोतदार, जैवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा घड्याळे, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. भावे आणि विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी सदर कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तांबे यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी डॉ. योगिता चौधुरी, डॉ. मधुरा मुकादम, प्रा. बाबासाहेब सुतार, प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले.

भित्तीपत्रक स्पर्धेत सिद्धेश नराळकर व इमराज जाधव (एम.एस्सी.) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. सारिका बर्गे, सिद्धी महाडिक (एस.वाय. बायोकेम), याग्येषा गमरे आणि जाहीन कलगंडे यांनी द्वितीय तर आर्या पाथरे, संकेत सांगवकर, नुपुरा रिसबूड (टी.वाय.मायक्रो) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

स्कीट स्पर्धेत ‘बंधन’ या एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्याला प्रथम क्रमांक, ‘ब्रेकिंग द प्रेज्युडीस’ या टी.वाय.बी.एस्सी.च्या स्कीटला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. शॉर्ट फिल्म स्पर्धेत ‘नवी सुरुवात’ या एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजीच्या फिल्मकरिता प्रथम क्रमांक, ‘टुगेदर वी विन’ ही शॉर्ट फिल्म द्वितीय क्रमांक तर ’१८+ ऑर नॉट’ या शॉर्ट फिल्मकरिता तृतीय क्रमांकाचे परितोषिक प्राप्त झाले. संपूर्ण स्पर्धांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या जनजागृती कार्यक्रमासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, श्री. मनोज पाटणकर आदि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. नितीन पोतदार, विभागातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments are closed.