gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे जागतिक एड्स दिन साजरा

गो. जो. महाविद्यालय एन.सी.सी. विभाग कार्यक्रम

१ डिसेंबर हा ‘जागतिक एड्स दिन’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूदल आणि नौदल राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडूलकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स हा रोग होण्याची कारणे आणि प्रतिबंधाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना याविषयी अधिक जनजागृती करावी असे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता पंधरवडयाचा’ प्रारंभ करत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहिम केली. या काळात शहराच्या स्वच्छतेविषयी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमासाठी भूदल राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे एएनओ लेफ्ट. डॉ. स्वामिनाथन भट्टार, नौदल विभागाचे एएनओ लेफ्ट. दिलीप सरदेसाई यांची उपस्थिती होती. तसेच भूदल आणि नौदल राष्ट्रीय छात्र सेनेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कॅडेट ज्योती घडशी हिने आभारप्रदर्शन केले.

Comments are closed.