गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. सुहास अनंत काणे यांचे अंटार्टिका मोहिमेवरील व्याख्यान संपन्न झाले. १९४ पासून संशोधनाच्या माध्यमातून झालेल्या अंटार्टिकाच्या यशस्वी मोहिमेसंदर्भात डॉ. काणे यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. अतिशय खडतर आणि रुक्ष वातावरणात जिथे मृत्यू नेहमी सोबत करत असतो; तिथे आपले अभियांत्रिकीचे कौशल्य दाखवत नाविन्य शोधायचं आणि प्रसंगी देशसेवेसाठी वाटेल ते काम करायचं असा एकूणच अनोखा आणि रोमांचक करणारा प्रवास डॉ. काणे यांनी लिलया सांगितला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, ‘रोमांच उल्हसित करणाऱ्या अशा निर्मिती करताना स्वत:च्या आतला आवाज ओळखा आणि निर्मितीसाठी प्रयत्न करा, यश तुमच्याजवळ सहजच येईल.
कार्यक्रमादरम्यान अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेत विभाग स्तरावर सादरिकरण केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पी.सी. अलेक्झाडर वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सुमेधा जोशी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, श्री. सदाशिव लेले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आरती पोटफोडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रश्मी भावे यांनी केले.