gogate-college-autonomous-updated-logo

रत्नागिरीकरांना दि. २६ डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण पाहण्याची अपूर्व संधी

येत्या अमावस्येच्या दिवशी म्हणजे दि. २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८ ते १२ दरम्यान कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण रत्नागिरीतून खंडग्रास दिसणार असून या दरम्यान शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा खगोलशास्त्र विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व पुणे येथील सेंटर फॉर सिटीझन सायन्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रहणाचा अभ्यास केला जाणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या रत्नागिरीतील निरीक्षण कक्षातून तसेच महाविद्यालयाच्या जवाहर मैदानातून निरीक्षणे नोंदविण्यात येणार आहेत तसेच महाविद्यालयाच्या मैदानावरून शहरातील नागरिकांना ग्रहण दाखविण्यात येणार आहे.

या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी निसर्गाच्या अविष्काराचा अनुभव घ्यावा. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.