आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन, रत्नागिरीमधील समाजसेवी संस्था असून जी कोकण आणि पश्चिम घाटात शाश्वत विकास, निसर्ग संवर्धन, शिक्षण आणि संगीतासाठी काम करते. हे फाउंडेशन ‘सागर महोत्सव’ सारख्या उपक्रमांद्वारे जबाबदार पर्यटन, पर्यावरण रक्षण आणि जैवविविधतेवर भर देते. आपल्या सामाजिक जबादारीच्या भूमिकेतून नुकत्याच झालेल्या ‘सागर महोत्सव’ तसेच होतकरू विद्यार्थांच्या गुणांना संधी देण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनचे संस्थापक श्री. नंदकुमार पटवर्धन यांचे सहकार्याने गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयास देण्यात आले.
जबाबदार पर्यटन आणि समुद्र किनारा स्वच्छता या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थांसाठी त्यांच्या जनजागृती उपक्रमांसाठी जे आर्थिक सहाय्य मिळाले त्यातून १६ विद्यार्थाना याचा प्रत्यक्ष लाभ झाला. तसेच कु. समिक्षा नारायण सावंत (प्रथम वर्ष विज्ञान) या विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन च्या आर्थिक मदतीचा हातभार लाभला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे हस्ते कु. समिक्षा नारायण सावंत हिला धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे, प्रा. सचिन सनगरे आणि श्री. महेश सरदेसाई उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालायातील विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम तसेच प्रशिक्षण व आर्थिक सहाय्यचे नियोजन केले जात असते. आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन रत्नागिरी सारख्या क्रियाशील संस्था तसेच अनेक दातृत्वाचे हात आपले सामाजिक योगदान देत असतात. महाविद्यालय यासाठी नेहमीच ऋणी राहील.





Visitors Online : 1