राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेची वर्ष २०१७-१८ ची मुंबई विद्यापीठाची विद्यापीठस्तर निवड फेरी नुकतीच पार पडली. यामद्धे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या दोन संधोधन प्रकल्पांची निवड झाली असून जानेवारी २०१८ मद्धे होणाऱ्या अंतिम फेरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे निवड झालेले विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकामद्धे संशोधनवृत्ती विकसित व्हावी याकरिता घेण्यात येणाऱ्या अविष्कार या स्पर्धेमद्धे गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे एकूण १५ प्रकल्प सादर करण्यात आले. यामद्धे अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागाच्या मंजिरी निदुरे आणि उर्मिला साळवी यांनी सादर केलेला ‘स्वयंमसहायता गटाचा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरनावर झालेले परिणाम’ आणि भौतिकशास्त्र विभागाचे केलेला प्रा. विवेक भिडे यांनी सादर प्रकल्प ‘पीसी बेस्ड आयव्ही मेजरमेंट सिस्टीम विथ प्रोग्रामेबल करंट सोर्स’ या दोन प्रकल्पांची निवड झाली आहे. याशिवाय चार प्रकल्प उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ठरले आहेत.
या यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.