दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे झालेल्या क्विक हिल फाउंडेशन मार्फत “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड २०२४”चा बेस्ट मीडिया अँड आउटरीच अवॉर्ड गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त ), रत्नागिरी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथील संगणक शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी क्विक हिल फाउंडेशनच्यावतीने सायबर सुरक्षा जागरूकता महिन्याचे औचित्य साधून “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या विषयावर “कमवा आणि शिका” योजने अंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे प्रशिक्षण घेण्यात आले होते. १२० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. त्या प्रशिक्षणामध्ये सुमारे ४२ विद्यार्थी सायबर वॉरियर म्हणून निवडून आले होते आणि या ४२ सायबर वॉरियरनि रत्नागिरी जिल्ह्यातील साधारण १०० शाळा/महाविद्यालयामध्ये मिळून २१००० विद्यार्थ्यांचे तसेच सुमारे १००० नागरिकांचे सायबर जागरूकतेतून प्रबोधन केले.
या कार्याची दखल घेऊन क्विक हिल फाउंडेशनने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील पार्थ मुळे, तौकीर दर्वे, तन्वी सुतार आणि तीर्था शिवलकर हे विद्यार्थी तसेच प्रा. केतन जोगळेकर आणि प्रा. सुदीप कांबळी यांना नामांकन होते. त्यापैकी तन्वी सुतार आणि तीर्था शिवलकर या दोन विद्यार्थिनींना बेस्ट प्रोसेस कंप्लायन्स विजेता तर प्रा. केतन जोगळेकर आणि प्रा. सुदीप कांबळी यांना बेस्ट प्रोसेस कंप्लायन्स (रनर अप) तर गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी करिता “बेस्ट मीडिया अँड आउटरीच” विजेता हे अवार्ड मिळाले.
हा सन्मान क्विक हिल फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अनुपमा काटकर यांच्याकडून स्वीकारताना संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख सौ. अनुजा घारपुरे, प्रा. केतन जोगळेकर, प्रा. सुदीप कांबळी उपस्थित होते.
या उपक्रमाचे रत्नागिरी एजुकेशन सोसायटी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी तसेच शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणक शास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. विवेक भिडे आणि संगणक शास्त्र विभागाच्या विभागप्रमुख सौ. अनुजा घारपुरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.