gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘संविधान दिनानिमित्त’ ग्रंथप्रदर्शन संपन्न

lib-2

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानविषयक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हणाले की, घटनाकार डॉ. आंबेडकर यांचे वाचन प्रेम सर्वश्रुत आहे. ग्रंथ हे आपले खरे मित्र असून आपण नियमित वाचन केले पाहिजे. जीवनाचे ध्येय आणि मोठे काम आपण ग्रंथांची कास धरून पूर्ण करू शकतो. संविधानाने आपल्याला अधिकार आणि कार्तव्ये प्रदान केली आहेत; त्यांना स्विकारून आपण सर्वांनी आपला देश खूप बलवान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, हिंदी विभाग प्रमुख डॉ. शाहू मधाळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. दिवाकर करवंजे, टाइम्स ऑफ इंडियाचे श्री. सुशांत आनंदे, प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस खुले ठेवण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Comments are closed.