गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व रत्नागिरीतील गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन शुक्रवार दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले आहे. गद्रे मरीन एक्सपोर्टमध्ये ‘प्रोडक्शन ट्रेनी’ या पदांकरिता मुलाखती घेतल्या जातील. महाविद्यालयातून शास्त्र शाखेतून रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी इ. विषय घेऊन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (मुले फक्त) या मुलाखतीकरिता उपस्थित राहू शकतात.
इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला बायोडाटा तसेच मूळ प्रमाणपत्रांसह डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत (मोबा. ९४२११४२५२९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.






Visitors Online : 2