गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे सोमवार दि. २९ जानेवारी २०२४ रोजी इसाफ या मल्टीस्टेट मायक्रोफायनान्स कंपनीकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. सेल्स ऑफिसर, एजन्सी बँकिंग आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदांकरिता रत्नागिरी जिल्ह्याकरिता या जागा भरायच्या असून याकरिता इ. १२वी तसेच पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत.
वय वर्षे २८च्या आतील विद्यार्थी स्त्री-पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे सकाळी १०.०० वाजता आपल्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
सदर कॅम्पस ड्राईव्हबद्दल अधिक माहितीसाठी करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत; मोबा. ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.