gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी आदित्य बिर्ला हेल्थ कंपनीकरिता कॅम्पस ड्राईव्ह

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी आणि आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता मुलाखतींचे आयोजन आयोजन केले आहे. सदरच्या मुलाखतींकरिता महाविद्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित राहून सहभागी होऊ शकतात. एजन्सी मॅनेजर या पदांकरिता तसेच रत्नागिरी व चिपळूण या ठिकाणच्या कार्यक्षेत्राकरिता या मुलाखती होतील. सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षामध्ये उत्तीर्ण झालेले फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार या मुलाखतींकरिता पात्र आहेत. येताना आपला बायोडेटा, गुणपत्रके, प्रमाणपत्रे इ. आवश्यक कागदपत्रे आणावीत.

अधिक माहितीकरिता महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंतदेसाई मोबा. ९४२११४२५२९ यांचेशी साधावा; उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Comments are closed.