गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कॉमर्स विभागातील ३१ विद्यार्थ्यांच्या यशस्वी निवडीनंतर पुन्हा एकदा आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता दि. १९ व २० ऑगस्ट २०१९ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे.
‘सिनिअर ऑफिसर’ या पदांकरिता होणाऱ्या या मुलाखतींकरिता महाविद्यालयातून २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात पदवी घेतलेल्या कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात. ही प्रक्रिया दोन दिवस चालणार असून दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता सुरु होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या मुलाखतींकरिता येताना मूळ कागदपत्रे, बायोडेटा, दोन फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड इ. कागदपत्रे सोबत आणावीत.
सदर मुलाखती महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत डॉ. केळकर सेमिनार हॉल येथे होणार आहेत. अधिक माहितीकरिता डॉ. रुपेश सावंत (मोबा. 9421142529) यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुसंधीचा फायदा करून घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.






Visitors Online : 0