gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘जागतिक कर्करोग दिन’ संपन्न

जागतिक कर्करोग दिन

जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतात या घडीला २५ लाख कर्करोगाने पिडीत रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे व प्रतिवर्षी या प्रमाणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या रोगावर मात करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समाजात जागरूकता करणे होय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा जैवरसायनशास्त्र विभाग प्रतिवर्षी महाविद्यालयात ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा करतो. यावर्षी ‘हेल्दी आऊट साईड स्टार्स फ्रॉम इनसाईड’ या विषयावर ‘चॉक आर्ट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत आपला सक्रीय सहभाग नोंदवला आणि कर्करोग या विषयावरील विविध पैलू आपल्या चित्रांतून मांडले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शरद आपटे यांनी केले. यावर्षी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाकडून स्पर्धेबाबत प्रतिसाद नोंदविण्यात आला. या स्पर्धेत जैवरसायनशास्त्र विभागातील प्रथम वर्षाच्या कु. प्राजक्ता वाजे आणि कु. अदिती कुड यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी दैनंदिन जीवनात आचरणात आणावयाच्या चांगल्या सवयी व त्यांचे आयुर्वेदात विषद केलेले महत्व याबद्दल वैद्य डॉ. मंजिरी जोग यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. चांगल्या सवयी आचरणात आणून आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो व त्याद्वारे कर्करोगासारख्या असाध्य वाटणाऱ्या आजारांवर आजारांवरदेखील मात केली जाते; याबद्दलचे दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे आणि जैवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वर्षा घड्याळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

जागतिक कर्करोग दिन’
जागतिक कर्करोग दिन
जागतिक कर्करोग दिन
Comments are closed.