गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलतर्फे मुंबई विद्यापीठाच्या कम्युनिकेशन आणि जर्नालीझम विभाग यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मिडिया क्षेत्रातील करियरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. यावेळी डॉ. सुंदर राजदीप, विभागप्रमुख, कम्युनिकेशन आणि जर्नालीझम विभाग, मुंबई विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. नाईक, गरवारे इन्स्टिट्यूट, मुंबई विद्यापीठ आणि श्री. सावंत, सिनेट मेंबर, मुंबई विद्यापीठ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामा सरतापे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन वाटा निवडण्याचे आवाहन केले.
या करिअर मार्गदर्शनप्रसंगी महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य विभागातील सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक डॉ. रुपेश सावंत आणि विविध विभागांतील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.