जिंदाल उद्योग समूहातर्फे आयोजित केलेल्या ‘रोखमुक्त समाज जनजागृती’ कार्यशाळेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्याशाळेकरिता जिंदाल उद्योग समूहातील फॅशन डिझायनिंग विभागातील कर्मचारी, बी.पी.ओ.मधील कर्मचारी आणि ट्रेनींग सेंटर मधील अधिकारी यांनी सहभाग घेतला. महाविद्यालाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रा. तेजश्री भावे आणि प्रा. मेधा सहस्रबुद्धे यांनी सर्वांना रोखमुक्त व्यवहार सोप्या पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी याविषय तयार करण्यात आलेली माहितीपुस्तिकाही अल्प शुल्कामध्ये वितरीत करण्यात आली. या उपक्रमाला जिंदाल उद्योग समूहाच्या श्री. मुकुंद शेवडे यांनी सहकार्य केले.
महाविद्यालाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आतापर्यंत आठ कार्यक्रमांद्वारे सुमारे ५०० व्यक्तींना रोखमुक्त व्यवहार कसे करावेत याविषयी विविध कार्याक्रमांतून माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या डिजिटल आर्थिक साक्षरता अभियानापासून प्रेरणा घेऊन विभागाने स्वयंप्रेरणेतून हे समाजकार्य हाती घेतले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या या उपक्रमाकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मार्गदर्शन केले.