gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र वितरण शिबीर संपन्न

cast validity certificate distribution

‘शासन आपल्या दारी’ योजनेनुसार सामाजिक न्याय विभागातर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतेच जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी १४५ विद्यार्थांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीचे आणि दि. ८ ते १४ एप्रिल २०१७ या कालावधीत ‘सामाजिक समता साप्ताह’ साजरा करण्यात येत आहे त्याचेही औचीत्य साधून सदर शिबीर आयोजित करण्यात आले.

तीन टप्प्यात हे शिबीर संपन्न झाले. यामध्ये सहज सोपी जात प्रमाणपत्र पडताळणी याविषयी माहिती, जात पडताळणी अर्ज कसा भरावा, कोणत्या कालावधीत भरावा, या प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत, वंशावळ प्रतिज्ञापत्र कसे सादर करावे, अन्य राज्यातून आलेल्या वैधता प्रमाणपत्र मिळते का, ससेच सरकारी कागदपत्रांमध्ये कोणताही अनधिकृत बदल करू नये, शैक्षणिक विषयक अर्ज सदर करताना शासकिय शुल्क रु. १०० व्यतिरिक्त कोणतेही शुल्क या समितीकडून आकारले जात नाही, त्रयस्त व्यक्तीमार्फत अर्ज सादर करू नये आदि प्राथमिक आणि महत्वाची माहिती जात पडताळणी समितीचे उपायुक्त श्री. प्रमोद जाधव यांनी दिली. आणि उपस्थित विद्यार्थांच्या शंकांचे निरसनही केले. दुसऱ्या टप्प्यात जात पडताळणी अर्ज स्विकारण्यात आले. त्यातील त्रुटीविषयक माहिती देण्यात आली. परिपूर्ण अर्ज स्विकारून त्यांची प्रमाणपत्रे सादर करण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात या विद्यार्थांना जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, जात पडताळणी समितीचे उपायुक्त श्री. प्रमोद जाधव, महाविद्यालयाचे लिपिक श्री. सचिन पेडणेकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.