gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डी.बी.टी. स्टार योजनेअंतर्गत सर्टिफिकेट कोर्स संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविदयालयाच्या विज्ञान शाखेतील  विभागांना गतवर्षी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत निधी प्राप्त झाला.

या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात येणारी प्रशिक्षणे, विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रभेटी तसेच विविध प्रकारची प्रदर्शने, व्याख्यानमाला, इत्यादी उपक्रम गतवर्षात राबविण्यात आले.

विद्यमान वर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र विभाग आणि होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्प्लोरिंग द वर्ल्ड ऑफ सायन्सेस विथ एक्सपेरिमेन्ट्स’ असा तीन दिवस प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम घेण्यात आला. या ‘एक्स्प्लोरिंग द वर्ल्ड ऑफ सायन्सेस विथ एक्सपेरिमेन्ट्स’ कार्यक्रमासाठी होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन संस्थेतर्फे डॉ. शिरीष पाठारे, विशाल ढवळे, विक्रांत घाणेकर या साधनव्यक्ती व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

पौष १६ ते १९ १९४४ (६ ते ८ जानेवारी 2023) यादरम्यान साधनव्यक्तींनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिके, त्या मागची संकल्पना व प्रात्यक्षिक करण्याची योग्य पद्धत आणि त्यातून मिळालेल्या निरीक्षणांचा योग्य निष्कर्ष कसा काढावा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्याच्याकडून योग्य पद्धतीने विविध प्रात्यक्षिके करून घेतली. यामध्ये भौतिकशास्त्र विभागामध्ये डॉ. शिरीष पाठारे व त्यांचे सहकारी यांनी  लेझर बीमचा पाण्यामधील सूक्ष्मजीव पाहण्यासाठी करता येणारा उपयोग, डिफ्रॅक्शनशी संबंधित विविध प्रात्यक्षिके व थर्मोडायनामिक्स यासंदर्भातील प्रत्यक्षिके याबद्दल विद्यार्थाना मार्गदर्शन केले. वनस्पती व प्राणीशास्त्र विभागामध्ये विक्रांत घाणेकर व त्यांचे सहकारी यांनी  विद्यार्थ्यांना जनुके म्हणजे काय व त्यांचे सेपरेशन कसे करावे? पेपर क्रोमॅटोग्राफी रिव्हर्स फेज थिन लेयर क्रोमॅटोग्राफी तसेच विविध शंख शिंपले हे नमुन्यांवरून कसे ओळखावे याबद्दल मार्गदर्शन केले व त्याच्याशी निगडित प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. रसायनशास्त्र विभागामध्ये विविध प्रकारच्या क्षारांचे नमुने तपासून ते कसे ओळखावेत? एम-डायनायट्रोबेन्झीन तयार करण्याची पद्धत इ. विषयाबद्दल विशाल ढवळे यांनी मार्गदर्शन केले.

दिनांक ९ जानेवारी आणि १० जानेवारी दरम्यान, ‘इनसाइटस ऑन बेसिक सायन्सेस’ या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यासाठी काही व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

दि. ९ जानेवारी रोजी भौतिकशास्त्र विभागामधून श्री पद्मनाभ सरपोतदार, खरे-ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर, यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नावली करून त्यातून चांगल्या प्रकारे आपण संशोधन आराखडा कसा तयार करावा ? या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील विद्यार्थी एकत्र येऊन कशा प्रकारचे काम करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे काही संशोधन करण्याची प्रेरणा दिली.

दुपार सत्रामध्ये डॉ. अनुराधा उपाध्ये निवृत्त शास्त्रज्ञ अघारकर संस्था पुणे, यांनी विद्यार्थ्यांना. जैवविविधता आणि जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व आणि त्यातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले. यादरम्यान सिरोपेजिया या वनस्पतीच्या विविध प्रजातींच्या संवर्धनसाठी त्यांच्या विद्यार्थ्यांसमवेत केलेले प्रयत्नाचे उदाहरण देऊन त्यांनी जैवविविधता संवर्धन क्षेत्रात असणाऱ्या संधी विद्यार्थ्याना सांगितल्या.

दि १० जानेवारी रोजी सकाळ सत्रामध्ये प्राणीशास्त्र विभागातर्फे. डॉ. उन्मेश कटवटे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी पश्चिम घाटातील स्वच्छ पाण्यातील परिसंस्था, त्यांचा हवामान बदलाशी असणारा संबंध आणि अशा अनेक परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या विशेष प्राण्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यामध्ये असणाऱ्या संशोधनाच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

दुपार सत्रामध्ये डॉ. प्रबोध चोबे यांनी विद्यार्थ्यांना इंटरडिसिप्लिनरी विज्ञान या विषयाबद्दल बोलताना कमळाच्या पानापासून प्रेरणा घेऊन जसे लोटस फॅब्रिक बनवले आहे तशा प्रकारे विचार करून विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती करावी आणि या करता शास्त्र शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकात समन्वय साधून संशोधन करावे असे उदाहरणांसहित सांगितले.

या सर्टिफिकेट कोर्सच्या सांगता समारंभप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी. शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य. डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. प्रबोध चोबे,  डॉ. उन्मेश कटवटे. डीबीटी स्टारचे समन्वयक. डॉ. विवेक भिडे तसेच शास्त्र शाखेतील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना माननीय प्राचार्य यांनी विद्यार्थी फक्त आपल्या विषयापुरते सीमित न राहता भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचादेखील अभ्यास करावा आणि विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्रितपणे संशोधन करावे असे मनोगत व्यक्त केले. शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना विद्यार्थीने या एक आठवड्याच्या कार्यक्रमामध्ये प्रात्यक्षिके व भाषणे यांचा कसा उत्तम लाभ घेतला हे सांगितले. या कार्यक्रमा दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके आणि भाषणे या कार्यक्रमात उत्तम सहभाग नोंदवला अशा विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या दरम्यान भौतिकशास्त्र विभागातून आशिष कुलकर्णी व मिथिला ठोंबरे रसायनशास्त्र विभागातून सार्थक जोशी आणि सेजल पिलणकर, वनस्पतिशास्त्र प्राणिशास्त्र विभागातून करण शिरगावकर आणि पूर्वा पावसकर या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रबोध चोबे यांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. उन्मेश कटवटे यांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम विविध संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा दरम्यान आभार व्यक्त करत असताना. डीबीटी स्टार एक्टिविटीचे महाविद्यालय समन्वयक डॉ. विवेक भिडे यांनी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी संस्थेच्या डॉ. गरिमा गुप्ता  यांचे आभार व्यक्त केले. तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य , विभागप्रमुख यांच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.

या अभिनव उपक्रमाचा महविद्यालयाच्या विज्ञान विभागातील १३० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

 

 

Comments are closed.