gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महविद्यालयात ‘चांद्रयान ३ अवतरण’ निमित्ताने विशेष कार्यक्रम

भारताची अवकाश संशोधन संस्था असलेल्या इस्रोची बहुचर्चित तिसरी चांद्र मोहीम सुरु झाली आहे. दि. १४ जुलै रोजी ‘चांद्रयान-३’ अंतराळात झेपावले आणि भारतीय अवकाश भरारीचा एक नवा अध्याय सुरु झाला. या नंतरचे विविध महत्त्वपूर्ण टप्पे पार पाडल्यानंतर दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५ वा. ४७ मि. नी चांद्रयान- ३ मधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरविण्यात येणार आहे.

या अभूतपूर्व घटनेचे साक्षीदार होण्यासाठी या प्रसंगाचे औचित्यसाधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राने एका उपक्रमाचे आयोजन केले आहे. या दिवशी महाविद्यालयात चंद्रयान-3चे प्रत्यक्ष अवतरण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार असून तत्पूर्वी दुपारी सायंकाळी ०४.३० वा. या मोहिमेविषयी तसेच इस्रोच्या भविष्यातील मोहिमाविषयी आणि इस्रोमधील करियर संधी या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. तथापि नियोजित वेळेत इस्रोने बदल केल्यास त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.

सदर उपक्रम सर्वांसाठी नि:शुल्क असून रत्नागिरीतील विज्ञानप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यानी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.