gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १८ व १९ जानेवारी रोजी सी.एम.एस. तर्फे ‘कॅम्पस ड्राईव्ह’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेलतर्फे सी.एम.एस. डेस्कटॉप सपोर्ट इंजिनिअर, नेटवर्क सपोर्ट इंजिनिअर आणि टेक्नीकल सपोर्ट इंजिनिअरकरिता ‘कॅम्पस ड्राईव्ह’चे आयोजन दि. १८ व १९ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले आहे. हा कॅम्पस ड्राईव्ह गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि शहरातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहे.

सी.एम.एस. तर्फे हा ‘कॅम्पस ड्राईव्ह’ आयोजित करण्यात आला असून याकरिता बी.एस्सी. व एम.एस्सी. कॉम्पुटर सायन्स व आय.टी. तसेच बी.ई. कॉम्पुटर सायन्स व आय.टी.चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. मुलाखतीकरिता उपस्थित राहू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळी ९.४५ वा. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे उपस्थित राहावे. सोबत येताना पासपोर्ट साईज फोटो, सर्व गुणपत्रके व प्रमाणपत्रे, बायोडेटा इ. मूळ कागदपत्रे झेरॉक्सप्रतींसह आणावीत. सदर ‘कॅम्पस ड्राईव्ह’च्या अधिक माहितीकरिता डॉ. रुपेश सावंत (९४२११४२५२९), डॉ. उमेश संकपाळ (९३५९८७००१८), डॉ. राम सरतापे (७८८७३१७२३३) यांचेशी संपर्क करावा.

महाविद्यालयाने नेहमीच अशाप्रकारच्या रोजगाराच्या सुसंधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या आहेत. तरी या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.