gogate-college-autonomous-updated-logo

कर्नल साईकिया यांची गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला भेट

colonel-saikia-visited-gogete-joglekar-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटला कर्नल जे. टी. साईकिया यांनी नुकतीच भेट दिली. कोल्हापूर येथील ६ महाराष्ट्र एन.सी.सी. गर्लस बटालियन या युनिटचा त्यांनी कमांडिंग ऑफिसर म्हणून पदभार स्विकारला आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि एन.सी.सी. विभागाच्या ए.एन.ओ. कॅप्टन डॉ. सीमा कदम यांच्याशी त्यांनी एन.सी.सी. कार्यक्रम व उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली. दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड, नौसैनिक कॅप, केरळ येथील राष्ट्रीय स्तरावरीलइ ए.टी.सी. कॅम्प, स्कुबा डायव्हिंग, ट्रेकिंग कॅम्प यामधील मुलींच्या यशस्वी योगदानाबद्दल त्यांनी एस.डब्लू. कॅडेट्सचे तसेच राष्ट्रीय स्तरावर मेजर पदाच्या फ्रेशर कोर्समध्ये ‘ए’ ग्रेड सोबतच राष्ट्रीय परितोषिक प्राप्त केल्याबद्दल कॅ. डॉ. सीमा कदम यांचे अभिनंदन केले. तसेच विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत नवनवीन उपक्रम समोर ठेऊन अधिकाधिक सक्षम बनवा अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कॅ. डॉ. सीमा कदम, महाविद्यालयीन सेवक श्री. नामदेव सुवरे, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.