मुंबई विद्यापीठातर्फे एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सत्र-६ चा निकाल ८९.३८% इतका लागला आहे. या परीक्षेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.
महाविद्यालयाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमद्धे साळवी मृण्मयी अशोक (७०० पैकी) ६०७ गुणांसह प्रथम क्रमांक, फकीर सना अनिस ६०२ गुणांसह द्वितीय क्रमांक, जोशी संपदा श्रीनिवास ५९९ गुणांसह तृतीय क्रमांक तर जोशी ऐश्वर्या सतीश ५९१ गुण आणि राजापूरकर लायबा मकबूल यांनी सुयश प्राप्त केले आहे.
महाविद्यालयातील ३७९ विद्यार्थ्यांपैकी ३३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २५ विद्यार्थ्यांनी ‘ओ’ ग्रेड, १४६ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड तर १५ विद्यार्थ्यांना ‘डी’ ग्रेड प्राप्त केली आहे. विषयनिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. एम.एच.आर.एम. गैबी ईजमा इनायत ८९ गुण, इकॉनॉमिक्स जोशी संपदा श्रीनिवास ९२ गुण, फायनान्शियल अकाउंटिंग रेमणे सीमा काशिराम ९८ गुण, कॉस्टअकौंटिंग वैद्य चैतन्य श्रीरंग ९८ गुण, ऑडिटिंग केळकर रुचिता प्रदीप ९१ गुण, मॅनेजमेण्ट अँड ऑर्गनायझेशन बिहेविअर राजेशिर्के प्रतीक्षा प्रेमराज ७९ गुण, फायनान्शियल मॅनेजमेण्ट देसाई शब्दाली वीरेंद्र ८७ गुण, मार्केटिंग मॅनेजमेण्ट खापरे नरेश दशरथ ८१ गुण, डायरेक्ट इन्डायरेक्ट टॅक्स वैद्य चैतन्य श्रीरंग ९९ गुण, पर्चेसिंग अँड स्टोअरकीपिंग राजापूरकर लायबा मकबूल, इबजी फ़ैजा मुश्ताक, कदम निशा सुहास यांना प्रत्येकी ९० गुण आणि कम्पुटर अँप्लिकेशन्स मध्ये वस्ता मुनाझा मुजाहिद ९० गुण हे सर्व विद्यार्थी विषयवार प्रथमस्थानी आले आहेत.
सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शकांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विभाग प्रमुख प्रा. बी. सी. भिंगारदिवे, अकौंटन्सी विभागप्रमुख डॉ. मकरंद साखळकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.