गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारांतर्गत संगणकशास्त्र आणि आयटी विभागातील विद्यार्थी समाजामध्ये सायबर जागरूकता निर्माण करत आहेत. यामध्ये ते विविध सायबर जगतातील गुन्ह्यांची माहिती आणि त्यातून कसे वाचावे याचे धडे आणि दाखले देतायत. त्याचाच एक भाग म्हणून “रत्नागिरीचाराजा” गणपती विसर्जन आणि मिरवणूक सोहळ्याचे औचित्य साधून दि. १८/०९/२०२४ रोजी मारुती मंदिर ते मांडवी दरम्याने मिरवणुकीत जमलेल्या लोकांना त्यांनी विविध सायबर गुन्ह्यांची माहिती आणि दाखले दिले आणि यातून आपण कसे वाचू याबद्दल सांगितले. या सोहळ्यात सुमारे १२०० जनसमुदाय जमला होता.
पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा करता करता सायबर गुन्हे करणाऱ्यांना चांगली बुध्दी द्या तसेच सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींना बळी पडू देऊ नका अशी प्रार्थनादेखील बाप्पाकडे यावेळी सर्व वॉरियर्सनी केली.
या सर्व ॲक्टिव्हिटीसाठी नेहमीप्रमाणेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि संगणकशास्त्र आणि आयटी विभागाच्या समन्वयक सौ. अनुजा घारपुरे यांनी शुभेच्छा दिल्या.