गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सायबर सेफ स्वराज्य या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत येथील संगणकशास्त्र आणि आयटी विभागातील विद्यार्थ्यांनी आपण सायबर सुरक्षित कसे राहू शकतो याबाबत महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर जमलेल्या विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. ज्यामध्ये प्रामुख्याने २ स्टेप व्हेरिफिकेशन, सायबर सेफ मेलबॉक्स, सायबर सुरक्षा शपथ, ऑनलाईन सायबर सुरक्षा क्विझ अशा सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील ‘सायबर सेफ मेल बॉक्स’ या उपक्रमांतर्गत असे काही सायबर सुरक्षित मेसेज तिथे जमलेल्या लोकांकडून घेण्यात आलेजे मेसेज बॉर्डरवर तैनात असणाऱ्या वॉरियर्ससाठी पाठवण्यात येणार आहेत. तसेच येथे जमलेल्या लोकांकरिता सायबर सेफ स्वराज्य सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला होता. जेणेकरून येणारे विद्यार्थी आणि नागरिक स्वत:चा सेल्फी काढत होते.
सदर उपक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या सामंजस्य करारांतर्गत घेण्यात आला होता. ज्याचं एकमेव उद्दिष्ट हे समाजामध्ये सायबर जागरूकता निर्माण करणे हे आहे. सदर उपक्रमामध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मिळून सुमारे ८०० जणांनी आपला सहभाग नोंदवला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी संगणकशास्त्र आणि आयटी विभागातील २०विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी संगणकशास्त्र आणि आयटी समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे, शास्त्र विभागाच्या उपप्राचर्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि या उपक्रमाचे शिक्षक- समन्वयक प्रा. केतन जोगळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)चे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी खुप साऱ्या शुभेच्छा देऊन सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.