gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये (स्वायत्त) ‘भव्य सायबर सुरक्षा रॅलीचे’ आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये (स्वायत्त) 'भव्य सायबर सुरक्षा रॅलीचे' आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि सायबरसेल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका भव्य सायबर सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्रीफळ वाढवून केले व सायबर सेलमधील सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर साहेब व त्यांचे इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.

सायबर फ्रॉड संदर्भातली गुन्हेगारीचे वाढते प्रमाण बघता सायबर शिक्षण ही एक काळाची गरज ठरत असल्याने क्विक हिल फाउंडेशन, पुणे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यामध्ये सामंजस्य कराराअंतर्गत जनतेत प्रामुख्याने सायबर सुरक्षा, ओटीपी गुन्हे, फ्रॉडलिंक्स याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता करण्यात आली. यात शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी व सर्वसामान्य जनता मिळून सुमारे १२०० लोकांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला होता. जनतेने सायबर शिक्षा व सुरक्षेबाबत माहिती उपलब्ध करून घेतली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त)चे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या उपक्रमासाठी सखोल मार्गदर्शन केले.  शास्त्रशाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व आयटी विभाग समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे यांनी तसेच हा संपूर्ण उपक्रम उत्तमरित्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपक्रमाचे शिक्षक श्री. केतन जोगळेकर व संपूर्ण विद्यार्थी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments are closed.