र. ए. संस्थेच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा (स्वायत्त) क्विक हिल फाऊंडेशनसोबत ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ जनजागृती करण्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे. याअंतर्गत सायबर वॉरियर क्लबची स्थापना करून १६ विदयार्थ्यांची सायबर वॉरियर तसेच ४ क्लब ऑफिसर अशा २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हा उदघाटन सोहळा गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे पार पडला .
या क्लबचे उदघाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. केतन जोगळेकर यांनी केले. तसेच याप्रसंगी प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनीही जनजागृती कां महत्वाची आहे यावर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्लब ऑफिसर आणि शिक्षक समन्वयक यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पार्थमुळ्ये- क्लबप्रेसिडेंट, वैष्णवीशिरसाट- क्लबसेक्रेटरी, कौशिकमुसळे- कम्युनिटीडायरेक्टर, वेदांग पाटणकर- पी.आर / मिडीया डायरेक्टर तसेच प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचा कोलॅबरेशन सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.
निवड झालेले विदयार्थी हे रत्नागिरी जिल्ह्यातील विविधशाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करतील हे गुन्हे टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दलही मार्गदर्शन करतील. तसेच सायबर गुन्हा झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करतील. तसेच वैयक्तिक आणि आर्थिक माहितीचे नुकसान होण्यापासून वाचवतील.
निवडझालेल्या झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.पी. पी. कुलकर्णी, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कोऑर्डिनेटर प्रा. अनुजा घारपुरे यांनी अभिनंदन केले आहे.