gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न

गोगटे जोगळेकर कॉलेजमधील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०४-१२-२०२३ ते शुक्रवार दिनांक ०८-१२-२०२३ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रात्येकक्षिकासह ०५ दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.नागरी संरक्षक दलातील अधिकारी श्री मालगावे सर आणि श्री अनिल गावडे व त्यांचे सहकारी यांनी ७८ एन.सी.सी कॅडेट्स व विद्यार्थ्यांना नागरी संरक्षक दलाची आवश्यकता, अग्नीशमन,प्रथमोपचार, नियंत्रण व संदेशवहन, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि विमोचन, सी.पी.आर.,कृत्रिम श्वसन,रुग्णास वाहून नेण्याच्या पद्धती,बँडेज या बाबतीत दररोज चार तास २० मिनिटे मुलभूत प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सना नागरी संरक्षक दलाचे प्रमाण पत्र, पाच वर्षासाठी सभासदत्व, शासन नियमानुसार प्रतिदिन प्रशिक्षण भत्ता दिला जातो.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन आणि समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि प्रशासकीय उप-प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर यांनी उपस्थित राहून केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात या विषयाला दिलेले प्राधान्य व या प्रकारचे कौशल्याधारित प्रशिक्षणाचेमानवी जीवनातील महत्व या बाबत सहभागी कॅडेट्सना मार्गदर्शन केले.तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या उप-प्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटी, आणि डॉ.अपर्णा कुलकर्णी यांनी या कार्यशाळेच्या व्यवस्थापनात बहुमोल सहकार्य केले.

Comments are closed.