gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय झेप युवा महोत्सव समूह चर्चेत झाले विचारमंथन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप-१९’ या वार्षिक युवा महोत्सवात विविधरंगी कार्यक्रमांची रेलचेल आहे. वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत विविध सामाजिक विषयांवर आयोजित समूहचर्चेत विद्यार्थ्यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. या स्पर्धेची कु. साक्षी पंडित विजेती ठरली.

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणांना आणि विचार शक्तीला चालना देणाऱ्या तसेच समूहात राहून आपले स्वतंत्र विचार व्यक्त करण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धेचे व्यस्थापन द्वितीय वर्ष कला मधील विद्यार्थ्यांनी केले. परीक्षक म्हणून पत्रकार श्री. मनोज मुळ्ये आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. देवेंद्र वणजू यांनी काम पाहिले.

स्पर्धेसाठी दोन फेऱ्या निश्चित केल्या होत्या; पहिल्या फेरीत चार गटांना वेगवेगळे सामाजिक विषय देण्यात आले होते. यातून चार विद्यार्थी निवडण्यात आले यामध्ये वंशिता भाटकर, साक्षी पंडित, यश केळकर आणि चिन्मय हर्डीकर यांचा समावेश होता. त्यांना आयत्यावेळी ‘वाढते शहरीकरण- कारणे, परिणाम आणि उपाय’ असा विषय देण्यात आला होता. याविषयावर स्पर्धकांनी आपली साधक बाधक मते मांडली.

स्पर्धेत उत्कृष्ट गटाचे पारितोषिक रिद्धी मुळ्ये, वेदिका आगाशे, सुशांत वेल्हाळ आणि यश केळकर यांच्या गटाला मिळाले. अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या चारही विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले तर प्रसन्न खानविलकर याला विशेष प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात आले. तर साक्षी पंडित उत्कृष्ट वक्ता पारितोषिकाची मानकरी ठरली तर वंशिता भाटकर उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकर ठरली.

पारितोषिक वितरण समारंभाला झेप समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, वक्तृत्व व वादविवाद विभाग सामन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. सायली पिलणकर, प्रा. शलाका आग्रे, प्रा. मधुरा आठवले-दाते आणि प्रा. सीमा वीर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृषीकेश आचार्य याने केले. याप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.