गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुचिता तेंडूलकर हिला महाराष्ट्र शासनाचा २०१८-१९ या वर्षीचा ‘गुणवंत खेळाडू’ हा जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे. छ. शिवाजी क्रीडानगरीत दि. २६ जानेवारी २०१९ रोजी प्रजासत्ताक दिनी झालेल्या समारंभात रत्नागिरीचे पालकमंत्री श्री. रवींद्रजी वायकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कु. सुचिता समाजशास्त्र विषयाची एम.ए.,भाग-१ची विद्यार्थिनी असून तिने आपल्या पॉवरलिफ्टिंग खेळातील कारकिर्दीत तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिद्दीच्या जोरावर अनेक वेळा नैपुण्य प्राप्त केले आहे. मलेशिया येथे झालेल्या आशियाई महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघातून तिने रौप्य पदक पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धांतून ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि ६ कांस्य पदके तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण, २ रौप्य आणि २ ब्राँझ पदके प्राप्त केली आहेत.
पुरस्कार विजेत्या सुचिता हिचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तिनही विभागांचे उपप्राचार्य, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व जिमखाना विभागातील सर्व सहकारी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.