gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक २०१९ चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. आनंद आंबेकर, प्रा. अरुण यादव, प्रा. शिवाजी उकरंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी दिवाळी अंक प्रदर्शनाचे औचित्य विषद केले. विविधरंगी आणि अनेक विषयांना वाहिलेले हे अंक आपल्याला दिपावलीच्या सुट्टीत निश्चितच आनंद देतील असे नमूद केले आणि वैविध्यपूर्ण अंकांविषयी सविस्तर माहिती दिली.

उपस्थितांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी नुकतेच संपन्न झालेले ‘नॅक’ मूल्यांकन आणि त्यातील ग्रंथालयाची भूमिका तसेच ग्रंथालयाला प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आयएसओ’ हे नामांकन याविषयी माहिती दिली. ग्रंथालयात सातत्याने आयोजित करण्यात येणारे विविध वाचकाभिमुख उपक्रम आणि त्याला मिळणारा विद्यार्थी सहभाग याविषयी समाधान व्यक्त केले. दिवाळी अंकांच्या माध्यमातून आपण फराळाबरोबरच हा दिवाळी अंकरुपी साहित्यिक फराळाचाही प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन
कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन
कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘दिवाळी अंक’ प्रदर्शन
Comments are closed.